सहस्नेह नमस्कार🙏🏻सुस्वागतम...! सुस्वागतम...!🤝🏻'बुध्दीमंथन' ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🏻
'बुद्धीमंथन' शिक्षक-बालक-पालक व प्रत्येक वाचकांसाठी एक परिपूर्ण शैक्षणिक संकेतस्थळ.......

7/25/2021

११ वी CET परीक्षा फॉर्म भरणे सुविधा पुनःश्च सुरवात

 

सन २०२१ २२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेबाबत (CET)……

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय दि. २८ मे, २०२१ व दि. २४ जून, २०२१ नुसार इ. ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षेचे (CET) आयोजन करण्यात येत आहे. सदर परीक्षेसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र भरण्याची सुविधा दि.२०/०७/२०२१ रोजी सकाळी ११.३० पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तथापि, तांत्रिक कारणास्तव सदर सुविधा दि. २१/०७/२०२१ पासून बंद ठेवण्यात आली आहे.

राज्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी ) परीक्षा सन २०२१ साठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षेची आवेदनपत्रे

सोमवार दिनांक २६.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून ऑनलाईन पध्दतीने खालील लिंक वर क्लिक करून माहिती भरावी

https://cet.11thadmission.org.in

Website वरुन भरण्याची सुविधा पुनःश्च उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

सदर सुविधा दिनांक ०२.०८.२०२१ अखेर (रात्री ११.५९) अखेर उपलब्ध असेल.

मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल Access करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सदर सुविधा दिनांक ०२.०८.२०२१ अखेर (रात्री ११.५९) अखेर उपलब्ध असेल.

मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल Access करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

टाकून उपरोक्त संकेतस्थळावर पाहता येईल.सदर प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांचा तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील.

सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा तपशिल मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्यमंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा सन २०२१ पूर्वी उत्तीर्ण/प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे.

यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया बुधवार दिनांक २८.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे

याबाबतचा तपशील स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तरी याबाबत संबंधीत विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी याची नोंद घ्यावी

— प्रतिनिधी,शरद दि.शेजवळ नाशिक


No comments:

Post a Comment

🔔SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL.....🔔