सहस्नेह नमस्कार🙏🏻सुस्वागतम...! सुस्वागतम...!🤝🏻'बुध्दीमंथन' ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🏻
'बुद्धीमंथन' शिक्षक-बालक-पालक व प्रत्येक वाचकांसाठी एक परिपूर्ण शैक्षणिक संकेतस्थळ.......

आकाशगंगा व आपली सूर्यमाला

 

आकाशगंगा

आकाशगंगा हे, सूर्यमाला आणि पर्यायाने पृथ्वी ज्या दीर्घिकेमध्ये आहे, त्या दीर्घिकेचे नाव आहे. तिचे इंग्रजी नाव Milky Way (मिल्की वे) अर्थात दुधट (दुधी रंगाचा) मार्ग असे आहे. अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा. हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू, मृग, नौका, वृश्चिक, धनु आणि गरुड या तारकासमूहातून ही आकाशगंगा पसरत गेली आहे.
आकाशगंगेचा जन्म
•ग्रीक लोककथा
    एके काळी ज्युपिटर देवाच्या पट्टराणीचा, जुनोचा मुलगा हर्क्युलस हा अतिशय अवखळ आणि खोडकर होता. एके दिवशी जुनो हर्क्युलसला स्तनपान करीत असतानाही त्याचा अवखळपणा चालू होता. त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनही तो दुधी रंगाचा पट्टा आपल्याला आकाशात दिसतो. ग्रीक लोकांनी त्या पट्ट्याला "दुग्ध मार्ग", "मिल्की वे" असे नाव ठेवले

आपली सूर्यमाला



                                                सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र ,[१] ५ बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्काधूमकेतूकायपरचा पट्टालघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.

सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, पृथ्वी, दोन अंतर्ग्रह- शुक्र व बुध, अन्य ग्रह, मंगळ व गुरू यांमधील लघुग्रहांचा पट्टा, चार वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुधशुक्र हे अंतर्ग्रह, पृथ्वीमंगळगुरूशनीयुरेनस (हर्शल) व नेपच्यून (वरुण) हे बाह्यग्रह. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे प्लूटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस, कायपरचा पट्ट्यातील एरिसहौमिआ व माकीमाकी. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.



ब्लू रंगाच्या शब्दावर क्लिक केल्यानंतर त्या शब्दा बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.

No comments:

Post a Comment

🔔SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL.....🔔